SwapnilDhamdhere

संचालक- पुणे जिल्हा दूध संघ,कात्रज

स्वप्नील बाळासाहेब ढमढेरे यांची पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या निवडणुकीत पहिल्यांदाच विजयी सलामी झाली.शिरूर तालुक्यातून संचालकपदी बहुमताने विजयी झाल्याने त्यांच्या रूपाने एका राज्यस्तरीय खेळाडूला जिल्हा दूध संघावर संधी मिळाली आहे.पुणे जिल्हा दूध संघाच्या संचालकांमध्ये प्रथमच राष्ट्रीय खेळाडूची वर्णी लागली असून जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीतून शिरूर तालुक्यातून निवडून आलेल्या संचालकांपैकी स्वप्नील ढमढेरे हे अगदी कमी वयात निवडून आलेले संचालक आहेत.राष्ट्रीय खेळाडू असलेले स्वप्नील ढमढेरे यांनी धनुर्विद्या स्पर्धेत आंतरराष्ट्रीय सहभाग घेतला होता.राष्ट्रीय पातळीवर त्यांना ६ पदके मिळाली असून राष्ट्रीय स्पर्धेतील उच्चांक रेकॉर्ड त्यांच्या नावावर आहे.राज्य पातळीवर आयोजित केलेल्या विविध स्पर्धांमध्ये त्यांनी २७ पदके प्राप्त केली आहेत .तसेच राज्य पातळीवर ६ रेकॉर्ड त्यांच्या नावावर आहेत.स्वप्नील ढमढेरे यांच्या खेळातील नैपुण्यतेची दखल घेत पुणे जिल्हा क्रीडा पुरस्कार (सन २०१५-१६) देऊन त्यांना गौरविण्यात आले आहे. राज्य सरकारकडून देखील शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (सन २०१५-१६ ) देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. स्वप्नील ढमढेरे हे खेळाडू म्हणून राष्ट्रीय पातळीवर चमकदार कामगिरी करत असताना त्यांचे वडील बाळासाहेब ढमढेरे हे तब्बल ४० वर्षांपासून राजकारणात असून ते ३५ वर्षे जिल्हा दूध संघाचे संचालक होते. राष्ट्रीय खेळाडू असलेल्या स्वप्नील यांची खेळाबरोबर राजकारणातील एन्ट्री तालुक्यात चर्चेचा विषय बनला आहे.