SwapnilDhamdhere

संचालक- पुणे जिल्हा दूध संघ,कात्रज

 तळेगाव ढमढेरे[ता. शिरूर] येथील शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते स्वप्नील बाळासाहेब ढमढेरे यांची पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या निवडणुकीत पहिल्यांदाच विजयी सलामी झाली.वकिलीचे शिक्षण घेतलेल्या व राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय धनुर्विद्या खेळात अनेक बक्षिसे मिळवलेल्या स्वप्नील यांना महाराष्ट्र शासनाने शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार देऊन गौरविले आहे. शिरूर तालुक्यातून संचालकपदी बहुमताने विजयी झाल्याने त्यांच्या रूपाने एका राज्यस्तरीय खेळाडूला जिल्हा दूध संघावर संधी मिळाली आहे .स्वप्नील यांचे वडील बाळासाहेब जयवंतराव ढमढेरे हे १९८७ पासून जिल्हा दूध संघावर सलग संचालक म्हणून काम करीत आहेत. आताच्या निवडणुकीत स्वतः बाळासाहेब ढमढेरे यांनी आपली उमेदवारी मागे घेऊन मुलगा स्वप्नील याला निवडणुकीच्या रिंगणात उतरविले. त्यांच्या रूपाने पुन्हा एकदा ढमढेरे यांच्या घराण्यात सलग ३५ वर्षे जिल्हा दूध संघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे.  पुणे जिल्हा दूध संघाच्या संचालकांमध्ये प्रथमच राष्ट्रीय खेळाडूची वर्णी लागली. जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीतून शिरूर तालुक्यातून निवडून आलेल्या संचालकांपैकी स्वप्नील ढमढेरे हे अगदी कमी वयात निवडून आलेले संचालक आहेत.

अध्यक्ष- जिल्हा राष्ट्रवादी क्रीडा संघटना

पुणे जिल्हा राष्ट्रवादी क्रीडा संघटना चा अध्यक्ष पदी स्वप्नील ढमढेरे यांची निवड करण्यात आली.क्रीडा क्षेत्रातील कामगिरी पाहता व राज्य शासनाचा मानाचा शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार मिळालेला आहे , त्या सोबत देश पातळीवरील कामगिरी व आंतरराष्ट्रीय पातळीवरील क्रीडा क्षेत्रातील कामगिरी पाहता अजित दादा यांच्या अनुमतीने जिल्हा क्रीडा अध्यक्ष पदी त्यांची निवड केली गेली.