राज्य शासन शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार्थी
![](https://swapnildhamdhere.com/wp-content/uploads/2024/01/aarcher1.png)
आर्चरी या खेळात स्वप्नील ढमढेरे यांनी सतत संघर्ष करत राष्ट्रीय चॅम्पिअन्स चा पल्ला गाठला.राष्ट्रीय खेळाडू असलेले स्वप्नील ढमढेरे यांनी धनुर्विद्या स्पर्धेत आंतरराष्ट्रीय सहभाग घेतला होता.राष्ट्रीय पातळीवर त्यांना ६ पदके मिळाली असून राष्ट्रीय स्पर्धेतील उच्चांक रेकॉर्ड त्यांच्या नावावर आहे.राज्य पातळीवर आयोजित केलेल्या विविध स्पर्धांमध्ये त्यांनी २७ पदके प्राप्त केली आहेत .तसेच राज्य पातळीवर ६ रेकॉर्ड त्यांच्या नावावर आहेत.
स्वप्नील ढमढेरे यांच्या खेळातील नैपुण्यतेची दखल घेत पुणे जिल्हा क्रीडा पुरस्कार देऊन त्यांना गौरविण्यात आले आहे. राज्य सरकारकडून देखील शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.
![](https://swapnildhamdhere.com/wp-content/uploads/2024/01/aarcher2.png)
![](https://swapnildhamdhere.com/wp-content/uploads/2024/01/aarcher3-1.png)